🌱 स्थापना १९८० • नोंदणीकृत सार्वजनिक संस्था (नोंदणी क्र. F2141 पुणे) 🌱 Established 1980 • Registered Public Trust (Reg No. F2141 Pune)
आकस्मिक कृती आराखडा • तातडीचा शेती सल्ला Urgent Contingency Action Plan & Agronomic Advisory

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी IRDE, पुणे यांचा कृती आराखडा व तज्ज्ञ शिफारशी

Contingency Action Plan & Expert Advisory for Drought-Affected Farmers | IRDE Pune

दुष्काळी परिस्थिती, जमिनीतील ओलाव्याची कमतरता आणि भात पिकावरील करपा रोगावरील तातडीच्या उपाययोजना
Emergency response measures for severe moisture deficit, paddy blast disease, and farmer rehabilitation
🏢 संस्था:Organization: IRDE, पुणे (Institute of Rural Development & Education) 🔬 शिफारशी:Recommendations: डॉ. बी. पी. पाटील (कृषी तज्ज्ञ) 📍 कार्यक्षेत्र:Focus Area: दुष्काळ व करपा रोग बाधित भात पिके
🌐 भाषा निवडा: 🌐 Select Language:
← मुख्य पान ← Home

परिस्थितीचे गांभीर्य आणि पार्श्वभूमी Current Crisis & Background Overview

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे, जमिनीतील ओलाव्याच्या कमतरतेमुळे आणि भात पिकावरील करपा रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी IRDE, पुणे संस्थेने पुढील उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

Due to prevailing severe drought conditions, critically low soil moisture levels, and widespread blast disease on paddy (rice) crops, farmers are suffering heavy agrarian and livelihood losses. To deliver prompt, impactful assistance to affected farming communities, IRDE, Pune has formulated the following contingency measures.

IRDE कृती आराखडा IRDE Action Framework

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी IRDE, पुणे यांचा कृती आराखडा (सारांश)

Action Plan for Drought-Affected Farmers by IRDE, Pune (Summary)

१ 1

भात पिकाला पाणी

Life-Saving Irrigation for Rice Crops

सिंचनाची सोय असलेल्या शेतांमध्ये वाचण्याची शक्यता असलेल्या भात पिकाला जीवनदायी पाणी द्यावे.

In fields equipped with irrigation sources, provide urgent life-saving protective watering to salvagable standing rice crops.

२ 2

पर्यायी पीक नियोजन

Contingency Crop Planning & Land Preparation

पूर्णपणे नष्ट झालेल्या भात पिकाच्या शेतांची योग्य कृषी सल्ल्यानुसार मशागत करून पुढील पिकासाठी जमीन तयार करावी.

For fields where paddy has completely perished, till and prepare the land as per certified agricultural guidance for immediate subsequent cropping.

३ 3

पर्यायी पिके

Selection of Alternative Resilient Crops

पाणी व जमिनीची परिस्थिती अनुकूल असल्यास गहू, मटकी, बाजरी, काला वटाणा आणि हरभरा यांसारख्या पिकांचा विचार करावा.

If moisture and soil conditions are favorable, encourage alternative drought-tolerant crops such as Wheat, Moth Bean (Matki), Pearl Millet (Bajra), Black Pea (Kala Vatana), and Bengal Gram (Harbhara).

४ 4

बियाणे उपलब्धता

Seed Availability & Distribution Support

गरजू शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावेत.

Mobilize active institutional efforts to procure and supply certified seeds of alternative crops to vulnerable farming families.

५ 5

पशुधनासाठी मदत

Livestock Protection & Philanthropic Assistance

धर्मादाय संस्था व सेवाभावी संघटनांच्या सहकार्याने गरजू शेतकरी कुटुंबांना पशुधन उपलब्ध करून देण्याची शक्यता तपासावी.

Collaborate with charitable trusts and non-profit organizations to explore the feasibility of providing and safeguarding livestock for distressed farm families.

६ 6

पशुपालन व पूरक व्यवसाय

Animal Husbandry & Supplementary Occupations

चारा, पशुवैद्यकीय सेवा आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांचे पर्यायी उत्पन्न वाढविण्यास मदत करावी.

Deliver structured guidance on fodder management, veterinary care, and livestock rearing to enhance and protect farmers' supplementary livelihood streams.

७ 7

समन्वय व अंमलबजावणी

Inter-Agency Coordination & Implementation Governance

संबंधित पदाधिकाऱ्यांनी इतर सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून आर्थिक व तांत्रिक मदत मिळवावी. बैठकीचे इतिवृत्तही आवश्यकतेनुसार सुधारावे.

Designated IRDE officers and field leaders shall actively coordinate with other NGOs, trusts, and agrarian agencies to secure financial and technical aid, amending institutional meeting minutes as required.

मुख्य उद्दिष्ट Core Strategic Objective

शेतकऱ्यांचे पीक नुकसान कमी करणे, बाधित कुटुंबांना तातडीचा आर्थिक व उपजीविकेचा आधार देणे आणि पुढील हंगामासाठी त्यांना सक्षम करणे.

To minimize crop losses, provide immediate economic and livelihood support to affected households, and empower them with resilience for the upcoming farming season.

कृषी तज्ज्ञ शिफारशी Expert Agronomic Advisory

डॉ. बी. पी. पाटील यांच्या शिफारशी

Recommendations by Dr. B. P. Patil

दुष्काळ व जमिनीतील ओलाव्याच्या कमतरतेमुळे बाधित भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी IRDE, पुणे यांच्या आकस्मिक कृती आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना Supplementary measures for inclusion in IRDE Pune's contingency action plan for drought-stressed rice growers

डॉ Dr

डॉ. बी. पी. पाटील (Dr. B. P. Patil), कृषी तज्ज्ञ

Dr. B. P. Patil, Agronomist & Technical Advisor

विषय: दुष्काळी परिस्थितीत भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त शिफारशी.
"IRDE, पुणे यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व जमिनीतील ओलाव्याच्या तीव्र कमतरतेतून सावरण्यासाठी तयार केलेला आकस्मिक कृती आराखडा अत्यंत उपयुक्त व अभिनंदनीय आहे. या आराखड्यामध्ये खालील अतिरिक्त उपाययोजनांचा समावेश करण्याची शिफारस करीत आहे."

Subject: Supplementary recommendations to bring relief to rice farmers facing drought stress.
"The contingency action plan formulated by IRDE, Pune to help rice growers overcome drought and acute soil moisture deficiency is highly useful and commendable. I recommend including the following supplementary measures in this plan."

१. भात पिकासाठी फवारणीद्वारे ताण सहन करण्याची क्षमता वाढविणे 1. Foliar Spray to Enhance Stress Tolerance in Rice Crops

दुष्काळी परिस्थितीत भात पिकाला तग धरता यावा, यासाठी खालील घटकांच्या फवारणीचा विचार करता येईल: To enable standing rice crops to withstand drought stress, foliar application of the following chemical components is recommended:

घटक शिफारस केलेले प्रमाण उद्दिष्ट व कार्य
पोटॅशियम सल्फेट २ टक्के द्रावण (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) पानाचा ओलावा टिकवणे, पेशींचा ताण कमी करणे आणि पानांतील पाण्याचे बाष्पीभवन नियंत्रित ठेवणे.
ट्रायअॅकॉन्टॅनॉल (विपुल) १ मिली प्रति लिटर पाणी प्रकाशसंश्लेषण सुरळीत ठेवणे व वनस्पतीमधील ताण-प्रतिरोधक क्षमता वाढवणे.
सिलिकॉन १० ग्रॅम प्रति लिटर पाणी पेशींच्या भिंती मजबूत करणे, पानांचे तापमान कमी राखणे आणि पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करणे.
बुरशीनाशक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी दुष्काळी हवेत पसरणाऱ्या भात पिकावरील करपा रोगाचा प्रभावी प्रतिबंध व नियंत्रण.
Component Recommended Dosage Functional Agronomic Purpose
Potassium Sulphate (SOP - 00:00:50) 2% solution (20 gm per litre of water) Regulates stomatal conductance, preserves leaf moisture, and mitigates cellular water stress.
Triacontanol ('Vipul') 1 ml per litre of water Stimulates photosynthesis and boosts plant resistance hormones under harsh moisture deficits.
Silicon 10 gm per litre of water Reinforces plant cell walls, moderates leaf canopy temperatures, and prevents wilting.
Fungicide Mancozeb (75% WP) 2 gm per litre of water Provides preventive and curative defense against severe blast / leaf blight on moisture-stressed paddy.

फवारणीचे वेळापत्रक आणि खबरदारी

Spraying Schedule & Crucial Precautions

  • वेळापत्रक: वरील मिश्रणाच्या दोन फवारण्या १२ ते १५ दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस विचारात घ्यावी.
  • परस्पर सुसंगतता: सर्व घटक एकत्र मिसळण्यापूर्वी त्यांची परस्पर सुसंगतता, उत्पादनाच्या लेबलवरील सूचना आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला तपासावा.
  • पिकाची अवस्था: पिकाची अवस्था व पाण्याचा ताण लक्षात घेऊनच फवारणी करावी.
  • Application Schedule: Undertake two successive foliar sprays at an interval of 12 to 15 days.
  • Chemical Compatibility: Prior to mixing all inputs in a single tank, verify chemical compatibility, check product label directions, and consult local agronomic specialists.
  • Crop Stress Stage: Perform spray operations strictly taking into consideration the growth stage of the crop and prevailing water-stress intensity (preferably during cooler morning or evening hours).

२. आपत्कालीन सिंचनासाठी पाणी उपसा व वाहतुकीची व्यवस्था 2. Emergency Irrigation, Water Lifting & Conveyance Arrangements

दुष्काळग्रस्त भात पिकाला जीवनदायी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात: To supply life-saving protective irrigation to drought-hit paddy, the following logistical mechanisms should be instituted:

कमी खर्चाचे कॅनव्हास / घडी करता येणारे पाईप

Low-Cost Canvas & Collapsible Plastic Pipes

कमी खर्चाच्या कॅनव्हासच्या किंवा कमी घनतेच्या प्लास्टिकच्या घडी करता येणाऱ्या (Lay-flat) पाइपसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.

Provide financial subsidies to farmers for lightweight canvas or low-density polyethylene collapsible (lay-flat) pipes to transport water from remote water bodies without seepage.

पोर्टेबल डिझेल पंप भाडेतत्वावर देणे

Rental Portable Diesel Pump Sets

वीज पुरवठा खंडित असताना किंवा दुर्गम भागात उपलब्ध पाण्याचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टेबल डिझेल पंप भाड्याने उपलब्ध करून द्यावेत.

Facilitate portable diesel pumps on a rental or shared community basis to lift and deliver water from emergency local reserves during electricity outages.

🤝 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे करा!

🤝 Support Drought-Affected Farmers Today!

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनदायी सिंचनाचे पाईप्स, फवारणी साहित्य, पर्यायी बियाणे आणि चारा मदत पोहोचवण्यासाठी IRDE, पुणे संस्थेसोबत सहभागी व्हा. आपले आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य अनेक शेतकरी कुटुंबांना नवजीवन देऊ शकते.

Partner with IRDE, Pune to supply life-saving irrigation pipes, foliar nutrient formulations, resilient alternative seeds, and fodder relief to distressed farming families. Your valuable contribution empowers rural households to withstand this crisis.